आयटीआय म्युच्यूअल फंडाच्या मालमत्तेने ओलांडला दोन हजार कोटी रुपयांचा टप्पा

समभाग विभागातील एकुण मालमत्ता निधी 1,460 कोटी रुपयांवर

एकुण निधीपैकी 42.88 टक्के निधीचा ओघ देशातील प्रमुख पाच शहरातुन

देशात 27 ठिकाणी फंडाच्या एएमसीची स्वतःची कार्यालये

मुंबई, 9 सप्टेंबर 2021 :-

म्युच्यूअल फंड उद्योगात नुकत्याच प्रवेश केलेल्या फंडापैकी एक असलेल्या आयटीआय म्युच्यूअल फंडाने 2019 पासून आपले कामकाज सुरु करताना वृध्दीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या फंडाच्या व्यवस्थापनांतर्गत असलेल्या एकुण निधीने (एयुएम) 31 ऑगस्ट 2021 अखेरीस तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

फंडाकडे 31 ऑगस्ट 2021 अखेरपर्यंत असलेल्या दोन हजार 34 कोटी रुपयांपैकी समभाग विभागात तब्बल एक हजार 460 कोटी रुपयांचे संकलन झालेले आहे, तर हायब्रीड आणि डेट विभागातील योजनांद्वारे अनुक्रमे 230 कोटी आणि 344 कोटी रुपये संकलित झालेले आहेत.

फंड हाऊसच्या या जोरदार कामगिरीबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी जॉर्ज हेबर जोसेफ म्हणाले की, फंडाच्या एएमसीवर गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या अतुट विश्वासाबद्दल आम्हाला खुपच समाधान मिळाले आहे. दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना समाधानकारक परतावा मिळवून देण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलेले आहे. “एसक्युएल” अर्थात एस म्हणजेच मार्जिन ऑफ सेफ्टी, क्यू म्हणजेच क्वॉलिटी ऑफ द बिझनेस आणि एल म्हणजेच लो अव्हरेज या गुंतवणूक तत्वज्ञानाआधारे आमचे फंड हाऊस मार्गक्रमण करत आहे आणि त्याआधारेच गुंतवणूकीचा सर्वोत्तम अनुभव गुंतवणूकदारांना प्रदान करत आहोत.

एकुण मालमत्ता निधी व्यवस्थापनाची ( एयुएम ) भौगोलिक विभागणीसुध्दा विविधांगी आहे. एकुण संकलित निधीत आघाडीच्या पाच शहरातुन 42.88 टक्के, त्यानंतरच्या पुढील दहा शहरातुन 24.18 टक्के, त्यापुढील वीस शहरांचा हिस्सा 16.03 टक्के, नंतरच्या 75 शहरांमधून 13.28 टक्के तर अन्य शहरांचा हिस्सा 3.63 टक्के असल्याचे जोसेफ यांनी स्पष्ट केले.

विविध योजनांआधारे दीर्घ मुदतीत सातत्यपुर्ण परतावा मिळविण्याचे फंडाचे उद्दीष्ट आहे.

अल्पमुदतीत आयटीआय म्युच्यूअल फंडाने आजतागायत तब्बल 14 हजार 500 फंड वितरकांची नेमणूक केली असून 27 शाखा उघडल्या आहेत.

आगामी दहा वर्षांत देशातील आघाडीच्या दहा म्युच्यूअल फंडांत स्थान प्राप्त करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. सर्वोत्तम कामगिरी बजावणारा फंड, पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांच्या हिताची पुरेपुर काळजी हीच आमची ओळख झाली पाहिजे. विविध पातळींवरील कार्यांसाठी आम्ही सर्वोत्तम आणि अनुभवी व्यक्तींचा चमू उभा केला असून त्याआधारे आमचे भागीदार आणि गुंतवणूकदार यांना सर्वोत्तम सेवा पुरवत आहोत. आमची सुरुवात अतिशय उत्तम झालेली असून देशभरातील आमच्या सर्व भागीदारांचा सक्रीय सहभाग असल्याचे गौरवोदगार श्री. जोसेफ यांनी काढले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!