रुग्णसंख्येत किंचित वाढ; बुधवारी 4,174 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.09 टक्क्यांवर
मुंबई,
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. गेले दोन दिवस तीन हजाराच्या घरात रुग्णसंख्या होती. त्यात किंचित वाढ होऊन चार हजाराच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. आज बुधवारी 4,174 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 65 रुग्णांचा मृत्यू झाला असून 4,155 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.08 टक्के इतके असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात 47,880 सक्रिय रुग्ण –
राज्यात 4155 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 63,08,491 कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 4174 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 65 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 1,37, 962 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 53 लाख 38 हजार 772 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 97 हजार 872 (11.74 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 7 हजार 913 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य 47 हजार 880 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार –
गुरुवारी 26 ऑॅगस्टला 5108, शुक्रवारी 27 ऑॅगस्टला 4654, शनिवारी 28 ऑॅगस्टला 4831, रविवारी 29 ऑॅगस्टला 4,666 तर सोमवारी 30 ऑॅगस्टला 3,741, मंगळवारी 31 ऑॅगस्टला 4196, 1 सप्टेंबरला 4456, 2 सप्टेंबरला 4342, 3 सप्टेंबरला 4313, 4 सप्टेंबरला 4130, 5 सप्टेंबरला 4057, 6 सप्टेंबरला 3626, 7 सप्टेंबरला 3988, 8 सप्टेंबरला 4174 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.
मृत्यूदर 2.12 टक्के –
19 जुलैला 66, 24 जुलैला 224, 26 जुलैला 53, 27 जुलैला 254, 28 जुलैला 286, 30 जुलैला 231, 31 जुलैला 225, 9 ऑॅगस्टला 68, 12 ऑॅगस्टला 208, 25 ऑॅगस्टला 216, 30 ऑॅगस्टला 52, 31 ऑॅगस्टला 104, 1 सप्टेंबरला 183, 2 सप्टेंबरला 55, 3 सप्टेंबरला 92, 4 सप्टेंबरला 64, 5 सप्टेंबरला 67, 6 सप्टेंबरला 37, 7 सप्टेंबरला 86, 8 सप्टेंबरला 65 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात 2.12 टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.
..या विभागात सर्वाधिक रुग्ण
ः मुंबई – 532
ः ठाणे पालिका – 68
ः नवी मुंबई पालिका -54
ः कल्याण डोबिवली पालिका – 60
ः रायगड – 74
ः पनवेल पालिका – 62
ः नाशिक – 48
ः अहमदनगर – 786
ः पुणे – 529
ः पुणे पालिका -276
ः पिपरी चिंचवड पालिका – 170
ः सोलापूर – 254
ः सातारा – 436
ः कोल्हापूर – 61
ः सांगली – 192
ः रत्नागिरी – 62
ः उस्मानाबाद – 55
ः बीड – 42