केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह व्हायरसचं संकट गडद, 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

तिरुअनंतपुरम,

केरळमध्ये कोरोनाने थैमान घातलं असताना आता निपाह व्हायरसच्या संकटाचीही त्यात भर पडली आहे. 3 सप्टेंबरला केरळमध्ये 12 वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाली होती. आता त्या मुलाचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या रुग्णाच्या शरीरातील काही नमूने पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आले होते. त्यामध्ये त्याला निपाहची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे.

केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितलं की, या मुलाचा मृत्यू अत्यंत दुर्दैर्वी असून त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध घेणं सुरु आहे. कोझीकोडमध्ये 19 मे 2018 साली पहिल्यांदा निपाहचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर केरळमध्ये निपाह विषाणूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

जगभरात निपाह हा हा एक जीवघेणा विषाणू समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचं सांगण्यात आलंय.

केरळमध्ये आधीच कोरोनाने थैमान घातलं आहे. गेले अनेक दिवस दररोज 30 हजारांच्या जवळ रुग्णसंख्या आढळत आहे. शनिवारी केरळमध्ये 29,682 रुग्णांची भर पडली आहे. केरळमध्ये कोरोनाचे संकट लक्षात घेता रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, केरळात अचानक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याचं कारण काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आलेला ओनमचा सण आहे.

निपाह व्हायरसची लक्षणं

ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे ही या आजाराची लक्षणं आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!