विजय मशाल पोहचली 1971 च्या युद्धातील शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या भेटीला
मुंबई,
01 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झालेल्या स्वर्णिम विजय वर्ष मशालीने 04 सप्टेंबर 21 रोजी मुंबईत राहणार्या शौर्य पुरस्कार विजेत्यांना भेट दिली.
वीर चक्र पुरस्कार विजेते कमोडोर इंद्रजीत सिंह (निवृत्त), कमांडर अशोक कुमार (निवृत्त) आणि विंग कमांडर बी बी सोनी (निवृत्त) यांनी एका समारंभात या विजय मशालीचे स्वागत केले. युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी या समारंभाला उपस्थित होते.
डॉ. भारती लव्हेकर (वर्सोवा) आणि श्री.अमीत श्याम साटम (अंधेरी पश्चिम).या आमदारांच्या उपस्थितीत , तिन्ही सशस्त्र दलांच्या वतीने महाराष्ट्राचे प्रभारी नौदल अधिकारी कमोडोर संजय सचदेव यांनी शौर्य पुरस्कार विजेत्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.
उपस्थित सर्वांनी ’भारत माता की जय’ असा जयघोष करत हा सोहळा संपन्न झाला, हे 1971 च्या युद्धात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणार्या जोशपूर्ण आणि लढाऊ वृत्तीचे खरे प्रतिबिंब होते.