कोरोना प्रतिबंधक निर्बंधांवरुन कलगीतुरा, ठाकरे बंधूंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

मुंबई,

कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे राज्यातील काही निर्बंध सरकारने उठवली नाहीयेत. मात्र, यावरुनच आता ठाकरे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सण-उत्सव साजरी करण्यावर असलेले निर्बंध आणि मंदिरांचे बंद असलेले द्वार यावरुन राज्य सरकारवर टीका केली. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना म्हटलं, सरकारचे त्या-त्या पक्षांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत तिकडे गर्दी चालते फक्त गणेशोत्सवात चालत नाही, दहीहंडीला चालत नाही. माझं म्हणणं असं आहे की, सगळ्यांसाठी नियम सारखा पाहिजे. सरकारचे कार्यक्रम आहेत तिकडे गर्दी चालणार त्यांना आणि गणेशोत्सवात चालणार नाही ही कुठली पद्धत आहे?

कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर‘ या ऑॅनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं, गर्दीचे ज्यांना सण उत्सव म्हणतो ते सुरू झालेले असले तरी संपलेले नाहीयेत. गर्दी होणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. काही ठिकाणी मी सुद्धा आणि आम्ही सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की, ज्या कार्यक्रमाला आम्ही जातो तेथे गर्दी होता कामा नये. काहीजण आपल्याला घाईघाईने सर्वकाही उघडण्यास सांगत आहेत त्यांना सुद्धा मी नम- विनंती करुन सांगतो कृपया यामध्ये राजकारण आणू नका.

उद्धव ठाकरेंनी पुढे म्हटलं, राजकारण आपलं होतं पण जीव जनतेचा जातो, त्या जनतेच्या जिवाशी खेळ होऊ देऊ नका. मी तर म्हणेल, मंदिरे नाही उघडली तर आंदोलन करु ते नाही केलं तर आंदोलन करु. मी पुन्हा एकदा सांगतो आंदोलन जरुर करा, आंदोलन झालंच पाहिजे पण हे आंदोलन कोरोनाच्या विरोधात झालं पाहिजे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!