असा आहे बुमराह-संजनाच्या प्रेमकहाणीतील टवीस्ट
मुंबई,
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने यावर्षी 15 मार्च रोजी स्पोर्टस प्रेजेंटर संजना गणेशनसोबत लग्न केले आहे. या दोघांची प्रेम कहाणी कोणाला माहित नव्हती. जेव्हा बुमराहच्या लग्नाची बातमी समोर आली, तेव्हा बहुतांश लोकांना तो कोणाशी लग्न करणार आहे, हे वाटत नव्हते. एवढेच काय तर त्याच्या लग्नाची बातमी देखील रुमर्स असल्याचे वाटत होते, परंतु त्यांचे लग्न झाले. संजना आणि जसप्रीत दोघांनीही गोव्यात लग्न केले, ज्यात खूप कमी लोकांचा समावेश होता.
सध्या बुमराह इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्या कसोटी मालिकेत सहभागी झाला आहे. त्याने अलीकडेच स्काय स्पोटर्सवर भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबत बोलताना आपल्या संजनासोबतच्या प्रेमकहाणीबद्दल काही खुलासा केला आहे.
बुमराहने सांगितले की, तो आणि संजना दोघेही एकमेकांना बर्याच काळापासून ओळखत होते, परंतु ते एकमेकांना गर्विष्ठ समजत होते, म्हणजे दोघांनाही असे वाटत होते की, समोरील व्यक्तीला खूपच ऊूग्ूल् आहे, म्हणून ते एकमेकांशी कधी बोलले नाही. पण वर्ल्ड कप -2019 च्या दरम्यान दोघं पहिल्यांदा एकमेकांशी बोलले, तेव्हापासून दोघांनी एकमेकांशी बोलायचे ठरवले.
नंतर बर्याच गोष्टी घडल्या
बुमराहने सांगितले की 2019 मध्ये, जेव्हा दोघांबद्दल बोलले जात होते तेव्हा हे दोघे सतत संपर्कात राहू लागले. बुमराह म्हणाला, फमी तिला मी अनेक वेळा पाहिले होते, पण आम्हा दोघांनाही समान समस्या होती. तिला वाटले की मला ऊूग्ूल् आहे आणि मला वाटले की तिला ऊूग्ूल् आहे. म्हणूनच आम्ही कधी बोललो नाही.‘
2019 च्या वर्ड कपदरम्यान मी पहिल्यांदा तिच्याशी बोललो, तेव्हा ती त्या मॅचला कव्हर करत होती. तेव्हा आम्ही एकमेकांचे चांगले फ्रेंड झालो आणि खूप बोलू लागलो. आमच्या लग्नाला पाच महिने झाले आहेत. आम्ही आनंदी आहोत.‘
यावेळी बुमराह खूप आनंदी आहे आणि तो याचे श्रेय संजनालाही देतो. आतापर्यंत त्याच्या आयुष्यात ज्या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत, त्या पाहून तो आनंदी आहे.
तो म्हणाला की त्याच्या पत्नीसोबत असल्याने त्याला खेळातून बाहेर पडण्यास मदत होते. बुमराह म्हणाला की, संजनाला खेळ समजतो या गोष्टीचाही त्याला फायदा होतो. तो म्हणाला, ‘तिला खेळ समजतो. तिला माहित आहे की, खेळाडू कोणत्या टप्प्यातून जातात. म्हणून जेव्हा गोष्टी व्यवस्थित चालतात किंवा नाही, तेव्हा आमच्याकडे बोलण्यासारख्या मनोरंजक गोष्टी असतात. ज्याची मला मदत मिळते.‘