मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, पुढील 3 वर्षात ग-ीन एनर्जीसाठी करणार 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई,
हवामान बदलासंदर्भात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय जलवायू शिखल संमेलन 2021 (घ्ण्ए 2021) मध्ये आज रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी हरित ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकल्याची मोठी घोषणा केली आहे. अंबानी यांनी पुढील तीन वर्षात अधिक क्षमतेचे चार विनिर्माण संयंत्र लावण्यासाठी 75 कोटींची गुंतवणूक केली आहे.
मुकेश अंबानी म्हणाले, आंतरराष्ट्रीय जलवायू शिखल संमेलनात संवाद साधणे ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. आत्मनिर्भर भाराताचे लक्ष्य लवकरच साध्य करेल. जलवायु परिवर्तन बिघडले तर त्याचा पृथ्वीवर मोठा परिणाम होणार आहे. हवामान बदल हे सध्या जगातील सर्व देशांसाठी मोछे आव्हान आहे. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ग-ीन एनर्जीच्या माध्यमातून वेगाने जावे लागणार आहे. भारतात एक नवी हरित क्रांती सुरू झाली आहे. जुन्या हरित क्रांतीने भारताला खाद्य उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर केले आणि आताची नवी हरित क्रांती ही देशाला ऊर्जा उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यास मदत करेल.
मुकेश अंबानी यांनी पुढील तीन वर्षात अधिक क्षमतेचे चार विनिर्माण संयंत्र लावण्यासाठी 75 कोटींची घोषणा केली. रिलायन्स सध्या हरित ऊर्जेवर काम करत असून पुढील तीन वर्षात 75,000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आहे.
’नवीन ऊर्जा वातावरणासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाची उपकरणे तयार आणि एकत्रित करण्यासाठी आम्ही चार मोठे सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल कारखाना, ऊर्जा साठवण बॅटरी कारखाना, इलेक्ट्रोलायझर कारखाना आणि इंधन सेल कारखाना निर्मिती कारखाना उभारण्याची योजना आखली आहे. भारतात हरित क्रांतीची सुरूवात झाली आहे. भारत आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंग ही देशातील सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. या पासून सुटका मिळवण्यासाठी हरित ऊर्जा हा एकमात्र पर्याय शिल्लक आहे, असे देखील अंबानी म्हणाले.