स्वर्णीम विजय मशाल हवाई दलाच्या मुंबई केंद्रात दाखल
मुंबई,
1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वर्णिम विजय वर्षाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, विजय मशाल आज मुंबईतील कलिना येथील हवाई दलाच्या केंद्रात दाखल झाली.
भारताच्या विजयाचे प्रतीक असलेली विजय मशाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली येथे प्रज्वलित केली, आता या मशालीचा देशभरात चारही दिशांना प्रवास सुरु आहे. वेस्टर्न सेक्टर व्हिक्टरी फ्लेम, ज्याला ’स्वर्णिम विजय मशाल’ असेही म्हणतात, ती 1 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईत दाखल झाली आणि गेट वे ऑॅफ इंडिया येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी या मशालीचे स्वागत केले.
सागरी हवाई मोहीम मुख्यालयाचे हवाई अधिकारी कमांडिंग विशिष्ट पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर व्हाईस मार्शल एस.आर.सिंह यांनी मुंबईतील हवाई दलाच्या केंद्रात विजय मशालीचे स्वागत केले. मुंबईतील हवाई दलाच्या केंद्रात विजय मशालीचे स्वागत करताना सागरी हवाई मोहीम मुख्यालयाचे हवाई अधिकारी कमांडिंग विशिष्ट पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर व्हाईस मार्शल एस.आर.सिंह यांनी या युद्धात सहभागी झालेल्या जेष्ठ सैनिकांना सन्मानित केले.
ही मशाल आज मुंबईतील हवाई दल केंद्र येथे पोहोचल्यानंतर सागरी हवाई मोहीम मुख्यालयाचे हवाई अधिकारी कमांडिंग विशिष्ट पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर व्हाईस मार्शल एस.आर.सिंह यांनी मशालीचे स्वागत केले. 1971 च्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या युद्धातील जेष्ठ सैनिकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.काही जेष्ठ सैनिकांनी या कार्यक्रमात बोलताना त्यांचे शौर्याचे गौरवशाली अनुभव कथन केले.
विजय मशाल 09 सप्टेंबर 2021 पर्यंत मुंबईतच ठेवली जाईल त्यानंतर ही मशाल गोव्यातील पणजीला रवाना होईल. देशासाठी दिलेल्या शौर्य सेवेबद्दल सन्मानार्थ ही विजय मशाल 1971 च्या युद्धातील शौर्यासाठी चक्र पुरस्काथींर्च्या आणि सर्वोच्च बलिदान देणार्या सैनिकांच्या घरीही नेण्यात येणार आहे.
सागरी हवाई मोहीम मुख्यालयाचे हवाई अधिकारी कमांडिंग विशिष्ट पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर व्हाईस मार्शल एस.आर.सिंह यांनी विजय मशाल स्वागत समारंभाच्या उपस्थितांना संबोधित केले.