’बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठानलाच भ-ष्टाचाराचं केंद्र केलं जातयं‘ नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई,

शिवसेना आणि राणे कुटुंबातील वाद ताजा असतानाच आता आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून नितेश राणे यांनी मुंबईतील क्रीडा संकुलाबाबत गंभीर आरोप केला आहे. क्रीडा संकुल हे भ-ष्टाचाराचं केंद्र बनत चाललं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच या पत्राद्वारे त्यांनी एक इशाराही दिला आहे.

पत्रात नितेश राणेंनी म्हटलं, शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयस्र-ाट बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच सामान्य मराठी माणूस होता. बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती व त्यांनी येणार्‍या काळाची पावलं ओळखली होती. मुंबई फक्त धन दांडग्यांची न राहता येथील सामान्य मुंबईकारांनाही खेळासाठी मैदानं, जलतरण तलाव, उद्यानं पहायला मिळावीत त्याचा लाभ घेता यावा तिथे आपली कौशल्य विकसीत करता यावीत यासाठी त्यांनी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानची स्थापना केली होती. पण आता खुद्द बाळासाहेबांनी स्थापना केलेल्या प्रतिष्ठानलाच भ-ष्टाचाराचं केंद्र करण्यात येतंय! असा संताप सामान्य नागरिक व्यक्त करतायेत.

या प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता रहावी म्हणून यावर महापालिकेचे नियंत्रण असावे असे बाळासाहेबांना वाटले होते म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हे महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीस करुन ठेवली. यात सदस्य म्हणून कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबांचा हेतू स्पष्ट होता. पण आता तसं राहिले नाही. या प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देवेंद्र कुमार जैन नियुक्त झाल्या-झाल्याच स्विमिंग पूल आणि बॅटमिंटन कोर्ट यांच्या खासगीकरणाचा घाट घातला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, हे या महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही असंही पत्रात म्हटलं आहे.

एकदा खासगी करण झालं की यात काम करणार्‍या 1000 हून अधिक कर्मचार्‍यांना उद्धवस्त केले जाणार हे स्पष्ट आहे. त्यातील निम्मे हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत. मुळात या दोन्ही संकुलातून मिळणारा पैसा प्रतिष्ठानच्या तिजोरीत जमा होतो. तरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम महापालिकेच्या निधीतून होते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रतिष्ठानची आहे. यामुळे नफ्यात चालणार्‍या तरण तलावाचे खासगीकरणच कशासाठी? व कुणासाठी? हे जलतरण तलावाचं पाणी नेमकं कुठं मुरतंय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकाराची आपण विशेष समिती नेमून महापौर किशोरी पेडणेकर व त्यांचे ओएसडी जैन यांची चौकशी करावी व हे खासगीकरण थांबवावे अन्यथा आम्ही प्रतिष्ठानचे 1000 कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरु असा इशाराही नितेश राणेंनी पत्रातून दिला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!