विराटने सचिन-पाँटिगसह दिग्गजांना टाकलं मागे, जाणून घ्या कोहलीची कामगिरी
मुंबई,
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिग आणि कुमार संगकारा यासारख्या दिग्गजाने मागे टाकलं आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 23 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. विराटने 480 डावात फलंदाजी करताना ही किमया साधली. इतर कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. हा टप्पा गाठण्यासाठी दुसर्या खेळाडूंना 500 हून अधिक डाव लागले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने 23 हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज
ः विराट कोहली: 490 डाव
ः सचिन तेंडुलकर: 522 डाव
ः रिकी पाँटिग: 544 डाव
ः जॅक कॅलिस: 551 डाव
ः कुमार संगकारा: 568 डाव
ः राहुल द्रविड: 576 डाव
ः महेला जयवर्धने: 645 डाव
विराट कोहलीला 2019 पासून अद्याप एकही शतक झळकावता आलेले नाही. तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. इंग्लंड दौर्यात विराट कोहलीला चौथ्या कसोटीतील पहिल्या डावापर्यंत दोन अर्धशतक झळकावता आलं आहे. त्याची या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या 55 इतकी आहे.
इंग्लंड दौर्यातील खराब कामगिरीचा फटका विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत बसला आहे. विराट क्रमवारीत टॉप 5 मधून बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने मालिकेत दमदार कामगिरी केली. याचा त्याला क्रमवारीत फायदा झाला आणि तो अव्वलस्थानी विराजमान झाला. रोहित शर्माचे देखील रॅकिंग वधारले असून तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर विराटची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ओवलमध्ये रंगला आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारताची संघाची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात बाद झाले. तेव्हा विराट कोहलीने एक बाजू लावत धरत अर्धशतक झळकावले. त्याची खेळी ओली रॉबिन्सन याने संंपुष्टात आणली. यानंतर भारताचा डाव गडगडला. चहापानापर्यंत भारताने 6 बाद 122 धावा केल्या आहेत.