वयाच्या 10व्या वर्षी दृष्टी हिरावली, पण ’ज्ञानदृष्टी’च्या जोरावर ती करोडपती झाली

मुंबई,

एक दिवस ’कोन बनेगा करोडपती’मध्ये जाण्याची त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत देखील केली. अखेर ’हॉट सीट’वर बसण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. कुटुंबाच्या सहकार्यामुळे याठिकाणी पोहोचणं त्यांना शक्य झालं.

अपघातानंतर मुलीचं कसं होणार, तिच्यासोबत आता लग्न कोण करणार, तिचं भविष्य कसं असेल अशी भीती हिमानीच्या आई-वडिलांना सतावत होती. पण अखेर तिच्या आई-वडिलांची चिंता नष्ट झाली आहे. हिमानी यांची आई गृहिणी आहेत, तर त्यांचे वडील टूरिज्म सेक्टरमध्ये काम करत आहेत. पण हिमानी यांनी त्यांच्या जिद्दीने अशक्यही शक्य केले आहे.

’शाळेत जात असताना मुलीची दृष्टी गेली. आम्ही कायम चिंतेत असायचो आता हिचं कसं होईल. पण आमच्या मुलीने आम्हाला सगळं काही दिलं आहे. ज्याची आम्ही कधी अपेक्षाही केली नाही. आमची मुलगी आमचा गर्व आहे.’ असं हिमाणीचे वडील विजय बुंदेला यांनी सांगितलं आहे.

’वयाच्या 10 व्या वर्षी अपघातात मुलीची दृष्टी गेली. आम्ही कायम चिंतेत असायचो आता हिचं कसं होईल. पण अशा परिस्थितीत ती कायम आम्हाला आधार देत होती. म्हणायची आई तु काळजी करू नको. मी एक दिवस तुझ नाव मोठं करेल. आज आमच्या मुलीने ते करून दाखवलं आहे. मी फार आनंदी आहे. ’ असं मत हिमाणीची आई सरोज बुंदेला यांनी व्यक्त केलं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!