कोकण रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार, रोहा ते वीर दुपदरीकरण पूर्ण
मुंबई अलिबाग
कोकण रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. रेल्वे मार्गावरील दुपदरीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासाला गती मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या 46 कि.मी. रेल्वे मार्गावरील दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे गाड्यांंना थांबून ठेवण्याचे प्रमाण कमी होणार आहे. या मार्गावरील कोंडी दूर होणार असल्याने प्रवासाचा वेळही वाचणार आहेत. या कामासाठी 530 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत.
दरम्यान, कोकण मार्गावरील प्रवास वेगवान करण्यासाठी रोहा ते ठोकूर असे 700 किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. आता कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या 46.8 कि.मी. रेल्वे मार्गावरील दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर गाड्या जास्त वेळ न थांबविता कमी कालावधीत कोंडी दूर होणार असल्याने प्रवासाचा वेळही वाचणार आहे.
कोकण रेल्वेची हद्द रोहा ते ठोकूरपर्यंत आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील रोहा ते कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील वीरपर्यंत 46.8 कि.मी. अंतराचे दुपदरीकरणाचे काम 30 ऑगस्ट रोजी पूर्ण झाले. तसेच रेल्वेमार्गाची गाड?ा चालविण्याची क्षमता वाढणार असून ट्रेन संचालनातील कार्यक्षमता वाढणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.