आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सर्वेक्षणात कामाच्या ताणामुळे प्रत्येक तिघातील एकाचे वैयक्तिक जीवन प्रभावित

कोवीडमुळे घरुन अंशतः काम करणाऱ्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे सर्वेक्षणात सिध्द, कोवीडपुर्वीच्या आरोग्य सुस्थितीचे प्रमाण 54 टक्क्यांवरुन कोवीडपश्चात 34 टक्क्यांपर्यंत घसरले

 आरोग्य आणि स्वास्थासाठी तब्बल 89 टक्के कर्मचाऱ्यांची कंपनीप्रमुखांनी विशेष कार्यक्रम राबविण्याची अपेक्षा, तर अवघे 75 टक्के कर्मचारी सध्या राबविल्या जात असलेल्या कार्यक्रमाबद्दल समाधानी

मुंबई -ता. 31ऑगस्ट, 2021

सुदृढ आरोग्य आणि मानसिक आरोग्याचा उत्तम आरोग्याशी संबंध याकडे पाहण्याचा दृष्टीकोन महामारीमुळे पुर्णतः बदलला असून तब्बल 86 टक्के नागरिक हे आपले शाररीक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी विविध प्रकारच्या शाररीक कसरतींमध्ये स्वतःला गुंतवून घेत असल्याचे आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने सध्याच्या महामारीनंतरच्या काळात स्वतःचे आरोग्य आणि स्वास्थ यात सक्रीय पध्दतीने नागरिकांची रुची समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले आहे. कोरोना महामारीनंतरच्या विश्वात आरोग्य आणि स्वास्थ विषयक उत्पादनांबाबत डोळसपणे निवडीतून त्यांची आरोग्यदायी राहण्याची सक्रीय वृत्ती प्रकट होते. हीच बाब वाढत्या जगजागृतीतून आणि आरोग्य विम्याच्या वाढत्या मागणीतूनही दिसून आली आहे.  

आरोग्य आणि स्वास्थ याकडे ग्राहकांचा बदलेला दृष्टीकोन समजून घेण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने संपुर्ण भारतातील विविध मेट्रो शहरात विविध स्थितीत कार्यरत असलेले म्हणजेच अंशतः घरून कामकाज तसेच संपुर्णतः घरुन कामकाज करणाऱ्या एकूण 1532 व्यक्तींचे सर्वेक्षण केले. आरोग्यदायी जीवनशैलीचे फायदे हा प्रत्येक तीनपैकी दोघा व्यक्तींसाठी मुख्य प्रोत्साहनपर घटक असून त्यांचे योग्य दिशेने पाऊल पडत असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

आरोग्य आणि स्वास्थ सर्वेक्षणात आढळलेल्या माहितीवर टिप्पणी करताना आयसीआयसीआय लोम्बार्डच्या विमालेखन,  फेरविमा आणि दावे विभागाचे प्रमुख संजय दत्ता म्हणाले की, समाजाच्या बदलत्या मनोधारणेत, आमचे ग्राहक हे केवळ आजारापणाच्या काळात आर्थिक सुरक्षाकवच म्हणून केवळ आरोग्य विम्याकडे पाहत नाही तर सर्वांगीण स्वास्थपुर्ण आरोग्याच्या प्रवासातील एक जोडीदार म्हणून त्याकडे पाहतात. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून केवळ सुंदर दिसण्यापुरतेच नव्हे तर स्वतःत आरोग्यदायी भावना जाणवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्याची बदलती मनोवृत्ती 47 टक्के नागरिकांमध्ये तर 42 टक्के तरुण पिढीत (25-35 वर्षाचा वयोगट) आम्हाला दिसून आली आहे. त्यामुळे सर्वांगीण स्वास्थाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्याप्रती जागरुक भारतासाठी एक माध्यम म्हणून कार्य करण्याचा आयसीआयसीआय लोम्बार्डचा मानस आहे.

आरोग्यदायी सवयी आता अंगवळणी पडल्या असून त्या वाढत असताना 100 टक्के उत्तरकर्त्यामध्ये ज्यांनी काही किंवा अन्य प्रकारच्या निरोगी सवयींचा स्वीकार केलेला आहे, त्या दीर्घ कालावधीसाठी स्वीकारताना दिसतील तर ज्यांनी अशा सवयी अद्यापपर्यंत स्वीकारलेल्या नाहीत, ते महामारीचा परिणाम म्हणून त्यांना यापुढे स्वीकारताना दिसतील.

एकूण स्वास्थाशी मानसिक आरोग्याचा संबंध

घरुन अंशतः काम करणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर कोवीडमुळे परिणाम झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच कोवीडपुर्वी असलेल्या 54 टक्के आरोग्य सुस्थितीच्या प्रमाणात लक्षणीय घसरण होऊन ते कोवीडनंतर थेट 34 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

लक्षणीय बाब म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांनी स्वतःच्या आरोग्याची चांगली जपणूक केल्याचे आढळले आहे. महामारीच्या काळात दोघा घटकांसाठी मानसिक आरोग्य हे मोठे आव्हान ठरले असले तरी फक्त 35 टक्के पुरुषांच्या तुलनेत 38 टक्के उत्तरकर्त्या महिला या आपल्या मानसिक आरोग्याबाबत समाधानी दिसल्या. शाररीक सुदृढतेच्या बाबतीत, महिला पुरुषांपेक्षा सरस ठरताना 42 टक्के पुरुषांच्या तुलनेत 49 टक्के महिला समाधानी आढळल्या आहेत.

भौगोलिक विविधतेचा विचार करता दिल्ली, बंगलोर, कोलकत्ता आणि पुण्यासारख्य़ा प्रमुख महानगरांमध्ये मानसिक आरोग्याचे गुणोत्तर घसरताना दिसत असताना मुंबई याला अपवाद राहिली आहे. मानसिक आरोग्याच्या बाबतीत अहमदाबादसुध्दा सरस ठरले. संपुर्ण भारताचा विचार करता मानसिक स्वास्थातील ढोबळ दरी ही 14 बिंदूवर (कोवीडपुर्व ते कोवीडपश्चात) राहीली, तर मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी ही दरी किमान (अनुक्रमे 7 आणि 6) बिंदूवर राहीली.

एकत्र कुटूंब पध्दतीत कोवीडचा संसर्ग झाल्यानंतर मानसिक आरोग्याच्या स्थितीत व्यापक प्रमाणात घसरण (15 टक्के) झाल्याचे आढळून आले. कोवीडपुर्वीची 49 टक्क्यांची पातळी कोवीडपश्चात 34 टक्क्यांवर आली आहे. याउलट कोवीडचा संसर्ग झाल्यानंतरही व्यक्तिगत पातळीवर मानसिक आरोग्याची पातळी एकसमान राहीली.

सर्वसमावेषक स्वास्थाच्या मार्गातील अडथळे

व्यक्तिगत आरोग्याचे वाढलेले महत्व अधोरेखित करताना या सर्वेक्षणाने व्यक्तिगत वेळेत (45 टक्के) तसेच पैशाची (44 टक्के) टंचाई हे आरोग्यदायी सवयींचा स्वीकार करण्यातील प्रमुख अडथळे असल्याचे आढळले आहेत. महिलांना घर सांभाळताना अधिक प्रमाणात स्वीकाराव्या लागणाऱ्या जबाबदारींमुळे पुरुषांच्या तुलनेत 44 टक्के महिलांना याचा फटका बसला आहे.

याचबरोबर दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता आणि पुणे या शहरात आर्थिक चणचण हे मोठे आव्हान दिसून आले असून त्यामुळे या शहरातील बहुतांश नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. तर मुंबई, दिल्ली, बंगळूर, अहमदाबाद आणि पुणे या शहरात वेळेचे व्यवस्थापन हीसुध्दा समस्या आढळली आहे. 

प्रवासात कर्मचारीच ठरले प्रमुख साथीदार

दिल्ली, हैद्राबाद आणि कोलकत्ता यासारख्या शहरात कामाच्या ताणाचा प्रत्येक तिघांपैकी एका व्यक्तीला फटका बसल्याचे दिसून आले. प्रामुख्याने 89 टक्के व्यक्तींनी आपल्या कंपनी प्रमुखांनी आरोग्य आणि स्वास्थ कार्यक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली तर फक्त 75 टक्के कर्मचारी हे सध्या त्यांच्या प्रमुखांकडून राबविल्या जात असलेल्या स्वास्थ कार्यक्रमाबद्दल समाधानी दिसले. उत्पादक परिणामांसाठी कामाच्या शाश्वत ठिकाणाचे महत्व स्पष्ट करताना यापुर्वी आरोग्य विमा, जिम आणि कामाचे लवचिक तास या मालकाकडून पुरविल्या जात असलेल्या सुविधा आता कर्मचाऱ्यांसाठी जणू काही वैयक्तिक स्वच्छतेसारखे घटक झालेले आहेत. नवशैलीच्या पध्दतीत कर्मचाऱ्यांना आता नियमित आरोग्य तपासणी, काम आणि जीवन यांच्यात समतोल, कॅफेटेरियात आरोग्यदायी अन्न आणि कामाच्या ठिकाणी आल्हाददायक वातावरण यासारख्या सुविधा हव्या असून त्या आता काळाची गरज बनल्या आहेत.

तंत्रज्ञान आणि कार्यसंस्कृतीचा बदलत चाललेला चेहरामोहरा

महामारीमुळे तंत्रज्ञानाच्या वेगाने वाढलेल्या वापराचा विचार करता, कोवीडचा संसर्ग झालेल्या व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे आणि अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

असे ICICI Lombard तर्फे प्रसिध्दी पत्रकात कळविले आहे .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!