समर्थ मंच माध्यमातून एरिया सभा कार्यशाळा मानखुर्द विभागात संपन्न
मानखुर्द दि. २९ (प्रवीण रा. रसाळ)
शुक्रवार दि. २७ ऑगस्ट रोजी चाईल्ड सेफ्टी फोरम एम/ पूर्व विभागाने संस्था संघटनाच्या प्रतिनिधी साठी एरिया सभा समर्थ मंच यांच्या माध्यमातून सावली फाऊंडेशन मानखुर्द या ठिकाणी एरिया सभा विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत ११ संस्था संघटना आणि वस्ती मधील स्थानिक कार्यकर्ते अश्या ३४ प्रतिनिधीनी आपल्या सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शन वर्षा ताई विद्या विलास एरिया सभा समर्थ मंच चे संयोजक आणि सूरजजी भोईर, एरिया सभा समर्थ मंचचे सहसंयोजक हे होते.
प्रमुख पाहुण्यांची ओळख आणि स्वागत संकल्प संस्थांचे विनोद हिवाळे यांनी केले, चाईल्ड सेफ्टी फोरम एम पूर्व विभागाचे उद्देश आणि कार्यशाळा ची प्रस्तावना युवा संस्था चे प्रकाश जी भवरे यांनी मांडली.
कार्यशाळा चे सुरुवातीला सूरजजी यांनी आपल्या सूंदर मधुर आवाजात चळवळीचे गीत सादर करून कार्यकर्ताना ऊर्जा निर्माण केली.
वर्षा ताई यांनी एरिया सभेचे मुख्य कार्य व कार्यप्रणाली यावर प्रकाश टाकला, संविधान मध्ये ७३ आणि ७४ घटना दुरुस्ती का केली ? या घटना दुरुस्ती काय उद्देश होता याची पूर्ण तपशीलवार माहिती दिली त्यानुसार आपण आपल्या प्रविभागात कसे कार्य करू शकतो एरिया सभा ची बांधणी कशी करावी तसेच एरिया सभा मुळे वस्ती विकास कशाप्रकारे होऊ शकतो या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
उपस्थित फोरम च्या कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थांच्या कार्यक्षेत्र मध्ये एरिया सभा संघटित करण्याच्या दृष्टीने विचार करत आहे प्रमाणे काही नियोजन बद्ध कार्यक्रमाची आखणी या कार्यशाळेत व्यक्त केले.
कार्यशाळा चे सांगता समारंभ आणि आभार प्रदर्शन सावली फाऊंडेशन चे संतोषजी सुर्वे यांनी केले.