विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे टिवटर हँडल सुरू

मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत टिवटर हँडल सुरू करण्यात आले आहे. सदर टिवटर हँडलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेटस प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तर आयोगाकडून टि्वटरवर रिप्लायचा ऑॅप्शन बंद करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या टि्वटर खात्याला टि्वटरकडून अधिकृत खाते असल्याचे दर्शवणारी ‘ब्ल्यू टिक’देण्यात आलेली नाही.

‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019,-सहायक कक्ष अधिकारी‘ चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती टि्वटरद्वार देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे टि्वट करून आयोगाने सांगितले.

कोरोनामुळे एमपीएससीची परीक्षा सतत पुढे ढकलली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात रोष निर्माण झाला होता. परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. परीक्षेत अनिश्चितता निर्माण झाल्याने नैराश्यात जाऊन अनेक तरुणांनी आत्महत्या केली होती. यानंतर आयोगाने 4 सप्टेंबरला श्झ्एण् ची संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला.

4 सप्टेंबरला चझडउ ची संयुक्त पूर्वपरीक्षा –

कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आता ही परीक्षा शनिवार 4 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यासंबंधित आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.

806 जागांसाठी होणार परीक्षा –

मार्च महिन्यात 806 जागांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा शनिवार 4 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!