ईडीचा राष्ट्रवादीला फायदाच, उद्धव ठाकरे – फडणवीस भेटीचा आनंद आहे – सुप्रिया सुळे
मुंबई
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धमकीला राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ईडीचा राष्ट्रवादीला नेहमीच फायदा झाला आहे. त्यामुळे त्याचे स्वागत आहे, असे त्या सुळे म्हणाल्या. त्याचेवळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेटीने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे, याकडेही त्यांचे लक्ष वेधल्यानंतर त्या म्हणाल्या, मला भेटीचा आनंदच आहे.
भाजपकडून ईडी, सीबीआयच्या धमक्या देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांचे स्वागत केले आहे. ईडीच्या कारवाईचे मी मनापासून स्वागत करते. राष्ट्रवादीला ईडीचा नेहमीच फायदा झाला आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपला चिमटा काढला. त्यानंतर त्यानी महाविकास आघाडीबाबत भाष्य केले. महाविकास आघाडी पाच वर्षे नाही पण 25 वर्षे या राज्याची सेवा करेल, असे त्या म्हणाल्या.
ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीवर त्यांनी हसत उत्तर दिले.. मी इतके इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोलले तर मी थोडासावेळ विचार करते. माझे आयुष्य ब-ेकिंग न्यूज नाही. माझे आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचे मनापासून स्वागत करायला हवे. माझ्यावर यशवंतराव चव्हाणाचे संस्कार झाले आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.