राज्यात पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता – हवामान विभाग
मुंबई,
गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आता पुन्हा राज्यातील वातावरण बदलले आहे. बंगालचा उपसागर आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वार्याची स्थिती तयार झाली आहे. महाराष्ट्रातील काही भागांत पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वार्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
’झाडांच्या खाली उभे राहू नका’
बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्?यता वर्तविण्यात आलेली आहे. झाडांच्या खाली उभे राहू नका, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आयएमडीने महाराष्ट्रासाठी 26-30 ऑगस्टसाठी हवामान अंदाज जारी केली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केली केला. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.
28 ऑगस्ट
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात येलो अ?ॅलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात यादिवशी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
29, 30 ऑगस्ट
29 आणि 30 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो.