गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ट्रोल करणार्यांना सुनावलं, जाणून घ्या प्रकरण
मुंबई,
टोकियो ऑॅलिम्पिकचा सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने बुधवारी एक मुलाखत दिली. यात त्याने ऑॅलिम्पिक फायनलमध्ये त्याच्या पहिल्या थ-ो आधी घडलेली घटना सांगितली. तो म्हणाला की, पाकिस्तानचा अॅथलिट अर्शद नदीमने माझा भाला घेतला होता. यामुळे मी आपला पहिला थ-ो गडबडीत केला.
नीरज चोप्राच्या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याला ट्रोल करण्यात येत आहे. यात त्याला काही लोकांनी शिवीगाळ केली आहे तर काहींनी त्याच्यावर भाल्यामध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप लावला आहे. दरम्यान, त्या मुलाखतीमध्ये नीरज चोप्राने असे काही म्हटलं नव्हतं. त्याने उलट अर्शद खानचे कौतुक करत पाकिस्तानी जनतेने त्याला साथ द्यावी, असे आवाहन नीरजने केले होते. तरी देखील सोशल मीडियावर ट्रोलर्सने चूकीचा मुद्दा पुढे रेटत अर्शद धारेवर धरलं आहे.
नीरज चोप्राने आता या विषयावर व्हिडिओ शेयर करत स्पष्टीकरण केलं आहे. नीरजने गुरूवारी टिवटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो म्हणतो, ’सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, पाकिस्तान भालाफेकपटू अर्शद नदीमने माझा भाला घेतला. हा मुद्दा मोठा बनवला जात आहे. ही सामान्य बाब आहे.’
सर्व भालाफेकपटू आपला भाला एकत्र ठेवतात आणि त्याचा वापर कोणीही करू शकतो. हा नियम आहे. पण काही लोक याला मोठा मुद्दा करत आहेत. सर्वांना माझी विनंती आहे की, असे करू नका. खेळाने आपल्याला सगळ्यांना एकत्र चालण्यास शिकवलं आहे. आम्ही सर्व भालफेकपटू मिळून राहतो, अशा शब्दात नीरजने आवाहन केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम नीरज चोप्राला आपला आदर्श मानतो. विशेष म्हणजे नीरजकडे पाहून त्याने भालाफेकपटू होण्याचा निर्णय घेतला. आशियाई स्पर्धेतील नीरज आणि अर्शद यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या स्पर्धेत नीरजने सुवर्ण तर अर्शदने कास्य पदक जिंकले होते.