राज्यपालांनी नाकारली मुख्यमंत्र्यांना भेट, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
मुंबई,
गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्या अजूनही प्रलंबित असल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आता नव्याने वाद पेटण्याची चिन्ह आहे. कारण, राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट नाकारली, असा आरोप काँग-ेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
आज राजभवनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. सकाळीच या भेटीसाठी वेळ मागितली होती. पण, राजभवनाकडून कोणतीची वेळ मागितली नाही, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत नियोजित कार्यक्रम घेण्यात आले.
पण, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेणार होते. हे बर्याच दिवसांपासून सुरू होतं. पण, राजभवनाकडून त्यांनी भेटीसाठी वेळच दिला नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
हायकोर्टाने आदेश दिला आहे की, मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा. पण, राज्यपाल हे दिल्लीला गेले. त्यानंतर आता भेट नाकारून इच्छुक उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
तसंच, राज्यपालांनी जर यादी मंजूर केली तर भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्ह आहे. कारण त्यांनी अनेकांना आश्वासनं दिली होती. हे सरकार पडल्यानंतर हे लॉलिपॉप देण्यात आलं होतं, त्यामुळे राज्यपालांनी हा निर्णय घेतला नसून त्यांच्यावर दबाव आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
पण, आता राजभवनावर मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन पोहोचले आहे. नार्वेकर कोणत्या मुद्यासाठी राजभवनावर पोहोचले आहे, याची माहिती मिळू शकली नाही.