किरीट सोमैया यांनी ज्योतिषाचा धंदा सुरू करावा – महेश तपासे

मुंबई,

राष्ट्रवादी काँग-ेसचे नेते छगन भुजबळ यांची 100 कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग-ेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सोमैयांचा समाचार घेतला. सोमैया यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा, अशी जोरदार टीका तपासे यांनी यावेळी केली.
अल जेबि-या कोर्टसंदर्भात किरीट सोमैया यांनी टवीट करत आरोप केला आहे. मात्र या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारासोबत राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे, असेही महेश तपासे म्हणाले.
भाजपा नेते वारंवार असे बेछूट आरोप करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करावे परंतु वस्तुस्थिती काय आहे हे समजून आरोप केले तर उचित होईल. एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचे कारस्थान ताबडतोब थांबवावे, असे ते म्हणाले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर किरीट सोमैया यांनी टिवटद्वारे आरोप केले आहेत. या आरोपावरून तपासे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!