चांदीवाल आयोगाने परमबीर सिंह यांना सुनावला 25 हजारांचा दंड
मुंबई,
चांदीवाल आयोगाने परमबीर सिंह यांना पुन्हा एकदा 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चांदीवाल आयोगासमोर आज सुनावणी करण्यात आली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आयोगासमोर विनंती केली की, परमबीर सिंह यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात यावे आणि त्यांना आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात यावे. तर अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय असलेले संजीव पलांडे यांच्यावतीने बिमल अग-वाल यांना आयोगासमोर बोलावण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर बिमल अग-वाल यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले, ज्यात त्यांनी 68 ऑॅडिओ क्लिपबाबत नमूद केले आहे. या क्लिपमधील आवाजाचा उतारा लिहिला जाणार आहे.
ऑॅडिओ क्लिपमधील बिमल अग-वाल, मनन नायक आणि सचिन वाझे यांचे हे संभाषण आहेत. सचिन वाझे आणि संजीव पलांडे यांना आज आयोगासमोर हजर करण्यात आले होते.
पुढील सुनावणी 30 ऑॅगस्टला –
आजही परमबीर सिंह हजर न राहिल्यामुळे 25 हजारांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे. हा दंड येत्या तीन दिवसात भरण्यास सांगितले आहे. यापूर्वीही ठोठावलेला 25 हजारांचा दंड अद्याप परमबीर सिंह यांनी भरलेला नाही. न्यायालयाने दोन्ही दंडांची रक्कम कोविड रिलीफ फंडात पुढील तीन दिवसात जमा करण्यास सांगितले आहे.
याआधीही सुनावला होता दंड –
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ-ष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या न्या चांदीवाल आयोगाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मंगळवारी (17 ऑॅगस्ट) पंचवीस हजार रुपये दंड सुनावला होता.
काय आहे प्रकरण?
अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे भ-ष्टाचार आणि खंडणी वसुलीचे आरोप केले होते. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. तर राज्य सरकारने देखील चांदीवाल आयोग नेमला आहे. या आयोगाला सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे विरोध केला होता.