सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आम्ही करू, आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा

मुंबई,

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेआधी शिवसेना नेत्यांच्या व्हायरल क्लिपबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केला. यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. न्यायालयीन प्रक्रियेआधी अनिल परब यांना जामीनाबाबत माहिती कशी मिळाली? अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत आहेत का? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

काल शिवसेनेच्या मंत्र्याच्या व्हायरल क्लिपमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा देखील हा प्रयत्न आहे. कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल, असं देखील अनिल परब यांनी म्हटलं. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्याचं जाहीर कार्यक्रमात स्वत:चं अज्ञान उघड पडलं. स्वत:चं अज्ञान उघड पडलं म्हणून हा सगळा प्रकार आहे. अज्ञान लपवण्यासाठी त्यांचा हा थयथयाट सुरु आहे. राणे साहेब याआधीही अनेकदा बोलले आहेत त्यांची बोलण्याची एक शैली आहे. परंतु सेनेने राडा केला. झालेल्या घटनेमुळे आपण देशाची माफी मागणार का? असा सवाल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!