टोकियो पॅराऑॅलिम्पिकविषयी काय म्हणाल्या दीपा मलिक?

मुंबई,

टोकियो पॅराऑॅलिम्पिकला उद्या मंगळवारपासून सुरूवात होत आहे. या पॅराऑॅलिम्पिकमध्ये भारतीय अ‍ॅथलिट सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाने इतिहास रचतील, अशी आशा भारतीय पॅराऑॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष दीपा मलिक यांनी व्यक्त केली.

टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये भारतीय अ‍ॅथलिट नऊ खेळात भाग घेणार आहेत. तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, कॅनोइग, शूटिंग, स्विमिंग, पावरलिफ्टिंग, टेबल टेनिस आणि तायक्वांदो या खेळात भारतीय खेळाडू पदकासाठी आपलं योगदान देतील. दरम्यान, भारताने यंदा 54 खेळाडूंचा सर्वात मोठा संघ पाठवला आहे.

भारतीय खेळाडूंच्या सर्वश्रेष्ठ कामगिरीबद्दल आशा व्यक्त केली जात असल्याचे विचारले असता, दीपा मलिक म्हणाल्या की, नक्कीच माझी देखील आशा आहे. या वर्षी भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ पाठवला आहे. मला आशा आहे की, आम्ही इतिहास रचू.

कोरोना महामारीत दोन वर्ष वाया गेली. तरी देखील मोठ्या संख्येत भारतीय अ‍ॅथलिट पॅराऑॅलिम्पिकसाठी पात्र ठरले. अनेक खेळाडूंनी जागतिक क्रमवारीनुसार देखील कोटा मिळवला आहे. खेळाडूंची संख्या आणि खेळ प्रकारात वाढ झाली आहे. तसेच आमच्याकडे अव्वल रॅकिंगचे खेळाडू आहे. जे एक चांगलं संकेत आहे. हे पॅराऑॅलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरू शकते, असे देखील दीपा मलिक यांनी सांगितलं.

2016 रिओ पॅराऑॅलिम्पिकमध्ये भारताने चार पदके जिंकली होती. यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्यचा समावेश आहे. दरम्यान, दीपा मलिक या पॅराऑॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांनी रिओ ऑॅलिम्पिकमध्ये शॉट पूलमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!