राणे जनआशीर्वाद यात्रा, मुंबई पोलिसांनी दाखल केले 42 एफआयआर
मुंबई
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 19 ऑॅगस्ट रोजी मुंबईत काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये कोविड 19 नियम उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी राणे, भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 42 एफआयआर दाखल केले आहेत.
महाराष्ट्र सरकारने यापूर्वी भाजपतर्फे काढण्यात आलेल्या रॅली मध्ये कोविड 19 नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे कारण देऊन 17 एफआयआर दाखल केले होतेच. 20 ऑॅगस्ट रोजी भाजप नेते आणि कार्यकर्ते यांच्या विरोधात आणखी 19 एफआयआर दाखल केले गेले आहेत.
विशेष म्हणजे 10 ऑॅगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांनीच मंत्रिमंडळात सामील झालेले नवे मंत्री जन आशीर्वाद यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महाराष्ट्रात नारायण राणे यांची यात्रा सुरु झाली असून ही यात्रा सात दिवस चालणार आहे.