”मराठा साम्राज्यच्या विस्तारात थोरल्या बाजीरावांचे मोलाचे योगदान” – श्री. अमोल पाठक

मुंबई,

अखिल भारतीय पेशवा संघटनेच्यावतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 321 व्या जयंतिनिमित्त ”पेशवे चौक” याठिकाणी विनम- अभिवादन करण्यात आले,
या कार्यक्रमाची प्रस्तावना अमित कुलकर्णी यांनी केली त्यावेळी ते म्हणाले कि मराठा साम-ाज्याचा दरारा संपूर्ण हिंदुस्थानावर निर्माण करणारे श्रीमंत बाजीराव पेशवे यांची आज 321 वी जयंती, राष्ट्रपुरुषांचे कार्य तरुणांनी समजून त्यांच्याबद्दल अभ्यास करणे गरजेचं आहे. जेणेकरुन त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ शकू त्यांचा पराक्रम समजू शकू. त्यानंतर अमोल पाठक यांनी मार्गदर्शन केले, ते म्हणाले श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या 40 वर्षाच्या आयुष्यात 41 लढाया जिंकल्या, तेहि एकहि लढाई न् हरता त्यामुळे त्यांना अजिंक्य योद्धा म्हंटले जाते, नंतर ते म्हणाले श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी उण्यापुर्?या 40 वषार्ंच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. 1720 मध्ये पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली व यानंतर आपल्या कारकीर्दीत नर्मदेच्या पलीकडे हिंदवी स्वराज्याची ध्वजा पोहोचविणारे ते प्रथम मराठा साम-ाज्याचे सेनापती होय. 400 वषार्ंच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारे बाजीराव पहिलेच. बाजीरावांनी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा व बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे आणि पवार हे मराठा सरदार उभे केले त्यामुळे ग्वाल्हेर, इंदोर, देवास आदी संस्थाने पूढे आली. बाजीरावांनी अवघ्या 20 वर्षात अनेक लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या देखील म्हणूनच छत्रपती शाहू महाराज म्हणत, ’मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावांची निवड करेन.’ एवढा एकच उद्?गार हे बाजीरावांची योग्यता सिद्ध करण्यास पुरेशी आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे पुन्हा होणे नाही अशा प्रकारे त्यांच्या अभिवादनातून इतिहासाला उजाळा देण्यात आला. त्यावेळी पेशवा संघटनेचे जिल्हाप्रमुख अमित कुलकर्णी, देविदास कुलकर्णी, नागेश बेनिवाल, सुमित कुलकर्णी, सचिन शिंदे, नरेश महाजन, ऐड.विनोद कुलकर्णी, गणेश लोखंडे, अनंत वाघमारे, मनोज गारे, सखाराम हिवरेकर, संजय देशपांडे, शेखर जोशी, दीपक कुलकर्णी, मकरंद पोखरकर, संकेत मोहिदे, किशोर कुलकर्णी, महेश जोशी, सुधीर कोठीकर, अनंता उजैनकर, सचिन कुलकर्णी, सुनील देशमुख, नितीन जोशी, संजय देठे, सतीश कुलकर्णी, राजेश दाभाडकर, राम कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा विजय असो !!
हर हर महादेव !!
छत्रपती शिवाजी महाराज कि जय !!
अश्या विविध घोषणांनी परिसर दणाणला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!