राज्यात आज 5,132 नव्या कोरोनाबाधितांची भर तर 158 जणांचा मृत्यू
मुंबई,
राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. आज 5,132 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 09 हजार 364 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93टक्के आहे.
राज्यात आज 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 58 हजार 069 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (0), धुळे (6), परभणी (15), हिंगोली (75), नांदेड (50), अमरावती (84), अकोला (27), वाशिम (3), बुलढाणा (37), यवतमाळ (13), वर्धा (5), भंडारा (5), गोंदिया (2), गडचिरोली (32) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भिवंडी निजामपूर, धुळे, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर सोलापूरमध्ये सर्वाधिक 756 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 14,89, 080 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,06, 345 (12.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,46,290 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 371 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 283 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,686 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2057 दिवसांवर गेला आहे.
भारतात कोरोना संसर्गाच्या दैनंदिन रुग्णवाढीत एका दिवसाच्या कमतरतेनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तसेच, लसीकरणाच्या आकड्यातही घट झाली आहे. काल देशात तब्बल पाच महिन्यांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच आज बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 35,178 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 55 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर काल देशात 88 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 440 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 24 तासांत 37,169 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.