केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आशा भगिनींचे कौतुक

मुंबई,

कोरोना काळात ग्रामीण व निमशहरी भागातील बालकांच्या व महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा भगिनींनी दिलेले योगदान अभिमानास्पद आहे, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आशा भगिंनींचे कौतुक केले.

जन आशीर्वाद यात्रेच्या तिसर्‍या दिवशी मालेगाव येथे आशा वर्कर्ससाठी आयोजीत केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. सुभाष भामरे, डॉ. अशोक उईके, लक्ष्मण सावजी, मालेगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश निकम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाल्या की, कोरोनाचे संकट रोखण्यासाठी प्रत्येक गावागावात जनजागृती करणे, वेळोवेळी तपासणी करणे अत्यावश्यक होते. गाव पातळीवर ही जबाबदारी आशा भगिंनींनी मोठ्या जोखमीने सांभाळली. त्यांचे हे योगदान कौतुकास्पद आहे. यावेळी डॉ. पवार यांनी आशा भगिंनींनीशी संवाद साधत प्रत्यक्ष काम करत असताना येणार्‍या अडचणी समजून घेतल्या. त्यावर त्यांना मार्गदर्शन केले. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत त्याविषयी माहिती दिली.

यात्रेच्या आजच्या तिसर्‍या दिवशी डॉ. पवार यांनी मालेगाव व सटाणा येथील अजेंग, वडणेर, काकडगाव, नामपूर, आसखेडा, सोमपूर, ताहाराबद, पिंपळनेर या गावांना भेटी देत जनतेशी व भाजपा पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!