मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप 5 च्या यादीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली! (सुधारित)
मुंबई,
देशात एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे क्रेझ होती. गेल्या काही वर्षात पंतप्रधानांची प्रतिमा घसरल्याचे इंडिया टुडेच्या ’मूड ऑॅफ द नेशन’च्या अहवालातून समोर आले आहे. द नेशनने देशातील मुख्यमंत्र्यांचेही सर्वेक्षण केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टॉप 5 च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तर 11 मुख्यमंत्र्यामध्ये भाजपाच्या केवळ दोन मुख्यमंत्र्यांना सहभाग असल्याचे अहवालात नमूद आहे.
भाजपाची लोकप्रियता कमी?
’इंडिया टुडे’च्या ’मूड ऑॅफ द नेशन’ने देशातील सर्वाधिक लोकप्रिय 11 मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली. 11 मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत पहिल्या स्थानावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, दुसर्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन तिसर्या क्रमांकावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनजींर्ना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले आहे. योगींना या सर्व्हेत केवळ 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही या यादीत समावेश आहे. देशात भाजपाची लोकप्रियता कमी होत असून देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणातही ही बाब समोर आली आहे.
मोदींच्या लोकप्रियतेत घट!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटली आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता 66 टक्क्यांवरून कमी होऊन 24 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. जानेवारी 2021 मध्ये 38 टक्के, तर ऑॅगस्ट 2020 मध्ये 66 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शविली होती. या महिन्यात केवळ 24 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. मात्र, गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.