उद्यापासून 5 दिवस बँका राहणार बंद
मुंबई,
ऑॅगस्ट महिन्यात बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. यामुळे आताच बँकांची महत्वाची काम हुरकून घ्या. देशातील विविध शहरांमधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका गुरुवारपासून सुमारे पाच दिवस बंद राहणार आहेत. बँक सुट्टी एकाच वेळी सर्व राज्यांना लागू होत नाही. सर्व ठिकाणी एकाच वेळी फक्त काही सुट्ट्या असतात.
रिझर्व्ह बँकेच्या यादीनुसार, ऑॅगस्ट महिन्यात बँकांमध्ये 15 दिवसांच्या सुट्ट्या होत्या. मोहरमच्या निमित्ताने नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ आणि इतर अनेक राज्यांमध्ये 19 ऑॅगस्ट रोजी बँका बंद राहतील. पहिली ओणम साजरी करण्यासाठी बंगळुरू, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरम येथील बँका 20 ऑॅगस्टला बंद राहतील. तिरुवनंतपुरम आणि कोचीसाठी 21 ऑॅगस्टला तिरुवोनमसाठी बँका बंद राहतील. प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी बँका बंद असतात.
या दिवशी बँका राहणार बंद
19 ऑॅगस्ट 2021 – मोहरम (आशुरा)
20 ऑॅगस्ट 2021 – मोहरम पहिला ओणम
21 ऑॅगस्ट 2021 – तिरुवोनम
22 ऑॅगस्ट 2021 – देशभरातील सर्व बँका रविवारमुळे बंद राहतील.
23 ऑॅगस्ट 2021 – श्री नारायण गुरु जयंती
28 ऑॅगस्ट, 2021 – चौथा शनिवार
29 ऑॅगस्ट 2021 – रविवारमुळे सर्व बँका बंद राहतील.
30 ऑॅगस्ट 2021 – जन्माष्टमी
31 ऑॅगस्ट 2021 – श्री कृष्ण अष्टमी