डीएसके फसवणूक प्रकरण : डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर
मुंबई
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी उर्फ डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना दिलासा देत त्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, न्यायालयात अशितोष श्रीवास्तव यांनी हेमंती कुलकर्णी यांची बाजू मांडली.
काय आहे प्रकरण -2017 मध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची 2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानंतर 17 फेब-ुवारी 2018 रोजी कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती यांना अटक केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुलकर्णी यांचे बंधू मकरंद यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता.