लाच प्रकरणी मोनोरेलच्या चीफ ऑॅपरेटिंग ऑॅफिसरवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

मुंबई

थकीत बिलाचे पेमेंट करण्यासाठी 20 लाखाची लाच मगितल्या प्रकरणी मुंबई मोनोरेलचे चीफ ऑॅपरेटिंग ऑॅफीसर डॉ. डीएनएल. मूर्ती यांच्याविरुद्ध मुंबई एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच मिळावी यासाठी संबंधित कंपनीची फाईल मुद्दाम अडकवून ठेवल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणाचा तपास करुन या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट की कंपनी होती, या कंपनीला मोनोरेल प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाउसकीपिंग, मेंटेनन्स कस्टमर केअर संबंधित कामे जानेवारी 2019 ते ऑॅगस्ट 2020 पर्यंतच कंत्राट देण्यात आलं होतं. लॉकडाऊनमध्ये सुद्धा सदर कंपनीने आपले काम चोखपणे बजावले. त्यांच्या कामात कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा कमतरता आढळून आली नाही.

वरील कामे पूर्ण केल्याच्या अनुषंगाने संबंधित कंपनीला 2 कोटी 50 लाख रुपये बिल आणि 32 लाख रुपये बँक गॅरंटीची रक्कम मिळणे अपेक्षित होती. मात्र ही रक्कम मिळण्यासाठी त्यांना खेपा घालाव्या लागत होत्या. दर वेळेला वेगवेगळी कारणं त्यांना देण्यात आली. शेवटी वारंवार प्रयत्न करून फेब-ुवारी ते मार्च 2021 पर्यंत त्यांच्या कंपनीला दोन कोटी दहा लाख रुपये मिळाले.

मात्र त्यांच्या खेपा घालायलाचा क्रम अजून संपला नव्हता. उर्वरित रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात होता. मात्र लाच मिळावी यासाठी आरोपी डॉ. डीएनएल मूर्ती यांनी फाईल आपल्याकडे अडकवून ठेवल्याचा आरोप तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे केली.

अँटी करप्शन ब्युरोकडे ही तक्रार आल्यानंतर आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता त्यांनी या प्रकरणाचा तात्काळ सखोल तपास सुरू केला. अँटी करप्शन ब्युरोला यामध्ये तथ्य सापडले आणि त्यांनी गुन्हा नोंदवला. मात्र या प्रकरणात अद्याप कुठलीही अटक करण्यात आली नाही. अँटी करप्शन ब्युरो कढून या प्रकरणात अजूनही चौकशी सुरू असून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत.

मोनोरेल हा प्रकल्प मुंबईकरांसाठी सोयीस्कर ठरणार होता. मात्र मुंबईत पांढरा हत्ती ठरलेल्या मोनो प्रकल्पाची ढिसाळ नियोजनामुळे वाट लागलीय. त्यात सुरू असलेल्या कामांमुळे मुंबईच्या ट्रॅफिकचा खोळंबा होतोय ते वेगळंच. मोनोचे वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, अपघात, प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद, आणि फसलेले नियोजन यांमुळे मुंबईत मोनोरेल्वे प्रकल्पावर यापूर्वीही अनेकदा टीका झालीय. आता मोनोचे चिफ ऑॅपरेटींग ऑॅफिसर असणार्‍या मुख्य अधिकार्‍याकडूनच लाच मागितली जात असल्याचं उघड झालंय. त्यामुळे मोनो प्रकल्प

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!