भारतीय नौदल आणि रॉयल बहरीन नौदलाचा सराव होणार सुरू

मुंबई, 17 ऑगस्ट 2021

पर्शियन आखातातील तैनातीचा भाग म्हणून मनामा, बहरीन येथे असलेल्या आयएनएस कोच्ची या विनाशिकेवर नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे वरिष्ठ ध्वज अधिकारी (एफओसीडब्लूएफ) रिअर ॲडमिरल अजय कोचर उपस्थित आहेत. नौदलाच्या पश्चिम ताफ्याच्या वरिष्ठ ध्वज अधिकाऱ्यांनी  16 ऑगस्ट 21 रोजी रॉयल बहरीन नौदलाचे प्रमुख, रियर ॲडमिरल मोहम्मद यूसुफ अल-असम यांची भेट घेतली आणि त्यांच्या नौदल तळावर त्यांनी औपचारिक मानवंदना स्वीकारली.

अल-कदिबिया पॅलेसमध्ये  नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे  वरिष्ठ  ध्वज अधिकारी रिअर ॲडमिरल अजय कोचर यांनी बहरीनचे पंतप्रधान आणि युवराज  राजकुमार सलमान बिन हमाद अल खलिफा यांचीही  भेट घेतली

अल-कदिबिया पॅलेसमध्ये बहरीनचे पंतप्रधान आणि युवराज राजकुमार सलमान बिन हमाद अल खलिफा यांची नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे  वरिष्ठ  ध्वज अधिकारी रिअर ॲडमिरल अजय कोचर यांनी   भेट घेतली .

आयएनएस कोच्ची या विनाशिकेवर भारतीय नौदल आणि बहरीन नौदलाच्या पथकांमध्ये  समन्वयन  आणि नियोजन परिषद सुरू आहे

दोन्ही नौदलांमध्ये 18 ऑगस्ट 21 रोजी होणाऱ्या सागरी सहकार्य सरावापूर्वी भारतीय नौदल आणि बहरीन नौदलाच्या पथकांमध्ये एक समन्वय आणि कार्यान्वयन नियोजन परिषद आयोजित करण्यात आली होती.

नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे  वरिष्ठ  ध्वज अधिकारी (एफओसीडब्लूएफ) रियर ॲडमिरल अजय कोचर यांनी रॉयल बहरीनचे नौदल प्रमुख , रियर  ॲडमिरल मोहम्मद युसूफ अल-असम यांची भेट घेतली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!