टायगर श्रॉफच्या ‘वंदे मातरम्’ गाण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
मुंबई,
आपल्या अभिनयासोबतच आपल्या फिटनेस, डान्स आणि स्टंटने अभिनेता टायगर श्रॉफने चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिबि-टींकडून टायगर श्रॉफच्या डान्स आणि फिटनेसचे कायमच कौतुक केले जाते. पण यावेळी टायगरच्या एका नव्या टॅलेंटचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी केवळ चाहतेच नव्हे तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टायगरच्या या नव्या कौशल्याचे कौतुक केले आहे.
टायगरला डान्स आणि फिटनेससोबतच गायनाची देखील आवड आहे. टायगर श्रॉफचे ‘वंदे मातरम्’ हे गाणे 15 ऑॅगस्ट म्हणजेच भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत चाहत्यांच्या भेटीला आले. टायगर श्रॉफने गायलेल्या या सुरेल गाण्यात त्याच्या आवाजाच्या जादूसोबतच त्याचा दमदार डान्स पाहायला मिळत आहे. टायगरने हे गाणे स्वातंत्र्यदिनी टिवटरवर शेअर केले होते. त्याने एक पोस्ट लिहित नरेंद्र मोदींना देखील या पोस्टमध्ये टॅग केले होते. या पोस्टमध्ये तो म्हणाला, वंदे मातरम्ष्ठहे केवळ शब्द नाहीत, तर भावना आहेत. अशा भावना ज्या आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करतात. या स्वातंत्र्यदिनी 130 कोटी भारतीयांसाठी एक छोटासा प्रयत्नष्ठ!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टायगर श्रॉफच्या या टवीटवर लगेचच प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले. मोदींनी आपल्या टवीटमध्ये क्रिऐटिव्ह प्रयत्न. वंदे मातरम् बद्दल तू जे बोललास त्याच्याशी पूर्णपणे सहमत असल्याचे म्हणाले.
तर मोदींनी दखल घेत प्रतिक्रिया दिल्याने टायगर श्रॉफला प्रचंड आनंद झाला असून त्याने एक टवीट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तुमच्याकडून असे कौतुक होणे हे माझ्यासाठी भाग्य आहे. मी अत्यंत भारावून गेलो असून कृतज्ञ असल्याचे म्हणत टायगरने आपला आनंद व्यक्त केला आहे. टायगर श्रॉफच्या ‘वंदे मातरम्’ या गाण्याला चाहत्यांची देखील मोठी पसंती मिळताना दिसत आहे.