कुख्यात गुंड छोटा शकीलचा भाऊ अन्वर विरोधात खंडणीचा गुन्हा : परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या ?

मुंबई,

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या तपासात अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे उघड होत आहे. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंड छोटा शकील याचा भाऊ अन्वर याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अन्वरसह दोघांवर खंडणी वसुलीचा गुन्हा

अन्वरसह अन्य दोघांवर खंडणी वसुली प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे?. या प्रकरणात दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. परमबीर सिंह प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीला तपासादरम्यान ऑॅडिओ क्लिप सापडली होती. या ऑॅडिओ क्लिपमध्ये दाऊद इब-ाहीमचा उजवा हात असलेल्या छोटा शकीलचा आवाज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये छोटा शकील हा एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावत असल्याची माहितीही या सूत्रांनी दिली आहे.

याच धमकीच्या ऑॅडिओ क्लिप प्रकरणात गुन्हे शाखेने छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणाची लिंक आता परमबीर सिंह वसुली प्रकरणाशी जुळवली जात असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2016 मधील ही धमकीची ऑॅडिओ क्लिप आहे. तेव्हा परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. या ऑॅडिओ क्लिपमध्ये छोटा शकील हा संजय पूनमिया नावाच्या एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी देत असल्याचे आढळून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या धमकीत छोटा शकील संजय पूनमियाला तू श्यामसुंदर अग-वाल या बांधकाम व्यवसायिकासोबत जुळवून घे असे धमकावत असल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत श्यामसुंदर अग-वाल ?

श्यामसुंदर अग-वाल यांनी परमबीर सिंहसह अन्य सहा पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ’परमबीर सिंह यांनी मला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले आहे. परमबीर यांनी माझ्यावर मकोका लावला होता, असेही या तक्रारीमध्ये श्यामसुंदर अग-वाल यांनी नमूद केले आहे. परमबीर सिंह यांच्यासह त्यांच्या काही पोलीस साथिदारांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जेव्हा परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त होते, तेव्हा माझ्याकडून त्यांनी जबरदस्ती पैशांची वसुली देखील केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!