पोलीस शौर्य, राष्ट्रपती पोलीस पदक, अग्निशमन शौर्य पदक विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून विशेष अभिनंदन
मुंबई,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस सेवेतील योगदानासाठी पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक विजेत्या महाराष्ट्रातील 78 पोलीस अधिकारी-कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे. आम्हाला महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान आहे. पोलीस दलाच्या बि-द वाक्याला जागून, या अधिकारी, कर्मचार्यांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील या अधिकारी कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.
देशातील 1,380 पदक विजेत्या अधिकारी-कर्मचार्यांची यादी केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन अधिकार्यांनी उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 25 अधिकारी, कर्मचार्यांनी ‘पोलीस शौर्य पदक’ तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 45 अधिकारी-कर्मचार्यांनी ‘पोलीस पदक’ आणि 11 पोलीस अधिकार्यांनी ‘उत्कृष्ट तपासासाठीचे केंद्रीय गृहमंत्री पदक’ पटकावले आहे. याशिवाय राज्याच्या अग्निशमन दलातील आठ अग्निशन अधिकारी, कर्मचार्यांना ‘अग्निशमन सेवा शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन, तसेच त्यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.