नौदल मुख्यालय, महाराष्ट्र यांच्या वतीने ’आझादी का अमृत महोत्सव’ – फ्रिडम सायक्लोथॉनचे मुंबईत आयोजन
मुंबई,
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातल्या पदार्पणाच्या निमित्ताने नौदल मुख्यालय, महाराष्ट्राने आज सकाळी मुंबईत ‘फ्रीडम सायक्लोथॉन’ आयोजित केले होते. 75 सायकलस्वारांनी ’आझादी का अमृत महोत्सव’ या निमित्त 75 किमी चे एकूण अंतर पार केले. या कार्यक्रमाचे ब-ीदवाक्य होते ‘शक्ति धैर्यमयती’- अर्थात शक्तीमधून धैर्य येते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नेव्हल एरिया (इध्श्अ) चे रियर अॅडमिरल अतुल आनंद, फ्लॅग ऑॅफिसर कमांडिंग यांनी झेंडा दाखवला. मुंबई शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून पर्यायी मार्गांद्वारे अंतर कापण्यासाठी सायकलस्वारांना प्रत्येकी 25 पुरुषांच्या तीन गटात विभागले होते. ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत सायकलस्वारांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भ-मंती केली. हा कार्यक्रम भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्ष झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेचा एक भाग होता.