टिवटरने आपली ब्लॉक पॉलिसी जाहीर करावी, नवाब मलिकांची मागणी

मुंबई,

काँग-ेस खासदार राहुल गांधींचे टिवटर अकाऊंट लॉक केल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ टिवट करणार्‍या काँग-ेस नेत्यांचे अकाउंट बंद करण्याची कारवाई टिवटरकडून करण्यात आली आहे. त्यामुळे टिवटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे? अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

बलात्कार पीडित मुलीच्या पालकांचे फोटो टिवटरवरून शेअर केल्यामुळे राहुल गांधी आणि काँग-ेसच्या इतर नेत्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे टिवटरकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईनंतर

राष्ट्रवादी काँग-ेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टिवटरच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत टिवटरने आपली ब्लॉक पॉलिसी जाहीर करावी अशी मागणी केली आहे. मागील काही दिवसांत टिवटर व केंद्रसरकारमध्ये वाद उफाळून आला होता. त्यानंतरच विरोधी पक्षांच्या नेत्यांचे टिवटर हँडल ब्लॉक होत आहेत आणि हे दबावाखाली होत आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग-ेस शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीती नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहिती नसावा म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग-ेस राजकारणात आल्यानंतर जातीजातींमध्ये तणाव निर्माण झाला असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!