स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

मुंबई, दि१५: विधान भवन, मुंबई येथे आज स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सभापती यांचे सचिव महेंद्र काज, उपसचिव विलास आठवले, शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, अवर सचिव रवींद्र जगदाळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने आदी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. विधानमंडळाच्या वैशिष्टयपूर्ण वास्तूला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या वास्तूचे सौंदर्य उजळून निघाले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!