राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम,महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले मैदानात/रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात आणि जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय  संस्था तसेच इतर संघटनाना सुपुर्द करण्यात आले आहेत, असे मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!