डेअरी पदार्थ, मांस आणि खाद्यपदार्थांमध्ये प्रतिजैविकांची निरीक्षण करणं झालं सोपं, मुंबई मध्ये संशोधन
मुंबई,
डेअरी पदार्थ, पाणी आणि मांसामध्ये प्रतिजैविकांचे निरीक्षण करणे आता सोपे झाले आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी प्रतिजैविकांचा स्तर शोधण्यासाठी एक साधा आणि नवीन सेन्सर विकसित केला आहे. अन्न आणि पाण्यात उपस्थित प्रतिजैविक बॅक्टेरिया मारण्यासाठी प्रतिजैविक खूप प्रभावी आहेत. मानवांमध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ते घरगुती वस्तू जसे की फ्लोर क्लीनर आणि साबणांमध्ये देखील वापरले जातात.
प्रतिजैविक या स्त्रोतांमधून वातावरणात प्रवेश करतात आणि आपले अन्न आणि पाणी दूषित करतात. मात्र, यामधून शरीरात थोडे थोडे जाणारे हे प्रतिजैविके हे शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे जीवाणूंना औषधांसाठी प्रतिरोधक बनण्याची संधी देतात आणि शरीरात कालांतराने बॅक्टेरियावर औषधांचा फारसा परिणाम जाणवत नाही.
त्यामुळे आपल्या दुधात आणि मांसामध्ये किंवा आपल्या सभोवतालच्या पाण्यात प्रतिजैविकांच्या पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. शिवाय, ते किमान आहे का? याची खात्री करण्यासाठी हे सेन्सर विकसित केले आहे. मुंबई आयआयटीचे प्राध्यापक सौम्यो मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांचा एक गट आणि मणिपाल इन्स्टिट्यूट ऑॅफ टेक्नॉलॉजी यांनी मिळून हा सेन्सर विकसित केला आहे. विकसित केलेला सेन्सर वापरण्यास सुलभ, परवडणारा, मजबूत आणि विश्वासार्ह आहे. याचा उपयोग β-श्ररलींरा प्रतिजैविकाची उपस्थिती तपासण्यासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल तेव्हा सेन्सरची किंमत 30-35 रुपये पेक्षा कमी असू शकते. संशोधकांनी सेन्सरच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे आणि पेटंट मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.