‘ऑगस्ट क्रांतिदिना’निमित्त स्वातंत्र्यसैनिकांना उपमुख्यमंत्र्यांकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन

‘ऑगस्ट क्रांतिदिना’निमित्त देशवासियांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, दि. ८ :- “देशवासियांसाठी ‘नऊ ऑगस्ट’क्रांतीदिनाचं महत्त्व स्वातंत्रदिनाइतकंच आहे. देशावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारला 1942 मध्ये आजच्याच दिवशी ‘चले जाव’असं निक्षूण सांगण्यात आलं. स्वातंत्र्यासाठी ‘जिंकू किंवा मरु’ची शपथ देशवासियांनी घेतली. मोठे नेते तुरुंगात बंद झाल्यानंतर सामान्य माणसांनी नेतृत्वं हाती घेऊन स्वातंत्र्यलढा पुढे नेला. देशातला सामान्य माणूसही देशहितासाठी त्याग करु शकतो. प्राणांचं बलिदान देऊ शकतो. नेतृत्वं करु शकतो, हे नऊ ऑगस्टच्या ऐतिहासिक क्रांतीदिनानं सिद्ध केलं आहे. कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य चिरंतन ठेवण्याचा पुनर्निर्धार करुया… देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी लढलेल्या सर्व सैनिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन. देशवासियांना नऊ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे. देशवासियांना क्रांतिदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!