चंद्रकांत पाटील उद्या भेटणार राज ठाकरेंना; म्हणाले, युती झाली नाही तर….
मुंबई प्रतिनिधी
5 ऑगस्ट
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 5 शुक्रवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चेला जोर आला असून चंद्रकांत पाटील यांनी ती शक्यता पूर्णत: फेटाळून लावलेली नाही.
राजकारणात कायमस्वरूपी कुठल्याच पर्यायावर फुली मारता येत नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आपल्या मनात अनेक शंका आहेत, त्या विचारायला आपण कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांची परप्रांतियांविषयीची भूमिका नेमकी काय आहे, याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून त्यांनी व्यापक भूमिका घ्यावी, अशी आपली इच्छा असल्याचंही ते म्हणाले.
केंद्र सरकारनं केलेल्या घटनादुरुस्तीवर काँग-ेसचे नेते टीका करतात, मात्र केंद्रात आणि राज्यात काँग-ेसचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण का मिळू शकलं नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. आरक्षणाच्या मर्यादेवरून टीका करणारे काँग-ेस नेते मुळात मराठा समाजाला मागास कसं जाहीर करणार आहेत, ते त्यांनी जाहीर करावं, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
यंदाच्या पुरात शेतकर्यांचे सर्व रेकॉर्ड, पासबुक, चेकबुक वाहून गेले आहेत. अगोदरच नुकसानीत असलेला शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे पूरग-स्त शेतकर्यांची कर्ज माफ करण्यात यावीत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
बदल्यांवरून टीका
राज्यात एका वेळी 15 टक्क्यांपेक्षा अधिक बदल्या करता येत नाहीत, असं 2005 चा कायदा सांगतो. महाराष्ट्रातील बदल्यांमध्ये कसा पैसा खाल्ला गेला, ते सचिन वाझे यांनी सांगितल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.