राज्यपालांच्या सहीनंतर राज्य सरकारकडून वरील सदस्य नियुक्ती आदेश जारी, तीन सदस्यांची नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी

5 ऑगस्ट

राज्यपालांची रात्री फाईलवर सही झाल्यानंतर राज्य सरकारने वरील सदस्य नियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार तीन सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रताप दिघावकर, राजीव जाधव यांचा समावेश आहे.

तिन्ही सदस्यांची नियुक्ती त्यांचा पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहिल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वायत्त असला तरी या आयोगाला पुरेसे सदस्यच मागील दोन वर्षांत राज्य सरकारने पुरवलेले नाहीत. एक सचिव आणि पाच सदस्य अशी या आयोगाची रचना असताना मागील दोन वर्षांपासून फक्त सचिव आणि एकच सदस्य अशा दोनच व्यक्ती आयोगाचे काम पाहत आहेत. आयोगाने तब्बल चार सदस्यांच्या जागा भरलेल्याच नाहीत. त्यामुळे तीन नवीन सदस्यांच्या नियुक्तीनंतर आता आयोगावर एकूण पाच सदस्य असतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!