बिर्ला अध्यक्षपदावरुन हटताच व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये घसरण

मुंबई प्रतिनिधी

5 ऑगस्ट

कुमार मंगलम बिर्ला गैर कार्यकारी अध्यक्षपदावरुन हटल्यानंतर गुरुवारी व्होडाफोन-आयडीच्या शेअरमध्ये घसरण पाहिला मिळाली आहे. बिर्लानी कर्जात बुडालेल्या आपल्या कंपनीला चालू ठेवण्यासाठी आपली हिस्सेदारी सरकारी संस्थानांकडे देण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर मागील तीन दिवसां पासून त्यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदवली गेली आहे.

गुरुवारी सकाळी 11.50 वाजता बीएसईमध्ये त्यांचे शेअर 5.33 रुपयांवर व्यवसाय करत होते जे मागील बंदपेक्षा 11.61 टक्क्याने कमी आहेत. त्यांनी 4.55 रुपये प्रति शेअरसह 52 आठवडयातील सर्वांत खालचा स्तर गाठला आहे.

बिर्लाच्या कार्यकारी अध्यक्षाच्या रुपात पद सोडण्याच्या विनंतीला मान्य करण्यात आले असून बोर्ड 4 ऑगस्ट 2021 ला त्यांच्या कार्य समाप्तीच्या काळा पासून हे प्रभावित राहिले आहे परिणामत: बोर्डने सर्वसहमतीने हिमांशु कपानिया जे वर्तमानात एक गैर कार्यकारी निदेशक आहेत त्यांना गैर कार्यकारी अध्यक्षाच्या रुपात निवडले आहे.

कपानिया हे आदित्य बिर्ला समुहातील नामांकित व्यक्ती असून 25 वर्षाच्या अनुभावासह एक दूरसंचार उद्योगातील दिग्गज आहेत. यामध्ये जागतीकस्तरीय दूरसंचार कंपनीमधील महत्वपूर्ण बोर्डचा अनुभव सामिल आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा सार्वजनिकपणे प्रसारीत झाल्याच्या काही दिवसापूर्वी समोर आले होते की त्यांनी केंद्रिय मंत्रीमंडळ सचिवांना लिहिले होते की ते कंपनीला चालू ठेवण्यासाठी कर्जात बुडलेल्या कंपनीतील आपली हिस्सेदारी सरकारी संस्थानाकडे सोपण्यास तयार आहेत.

व्होडाफोन आयडिया जे आधी पासूनच कमजोर आर्थिक स्थितीमध्ये आहेत व त्यांच्याकडे एनजीआरची थकबाकी रक्कम 50,399.63 कोटी रुपये आहे आणि त्यांनी या आधी 7,854.37 कोटी रुपये भरले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!