पालघर जिल्हा माहिती कार्यालयाच्या नवीन जागेचे काम प्रगतीत

नवी मुंबई, दि.04 : पालघर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय संकुलातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या जागेचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज कामाची पाहणीकरुन सूचना केल्या.

यावेळी पालघरचे जिल्हा माहिती अधिकारी, राहुल भालेराव, विभागीय माहिती सहाय्यक प्रविण डोंगरदिवे, लेखापाल गंगाराम बांगारा आदि उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जागेची पाहणी केली होती.  या जागेवर लवकरच जिल्हा माहिती कार्यालय सुरु करावे, अशा सूचना दिल्या होत्या.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नविन इमारतीच्या परीसरातील प्रशासकीय इमारत-ब मध्ये जिल्हा माहिती कार्यालयास प्रशस्थ जागा उपलब्ध करुन दिली आहे.  या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी यांना स्वतंत्र कक्ष, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉडिंग रुम, पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स हॉल तसेच कार्यालयाचा अभिलेख ठेवण्यासाठी स्वतंत्र व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा अभिलेख कक्ष  देखील आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले आहेत.  नवनिर्मित कार्यालयाच्या अंतर्गत सजावट व बांधकामाबाबत डॉ. मुळे यांनी  समाधान व्यक्त केले. आवश्यक ते अंतर्गत बदलही सूचविले. लवकरच शासनाच्या आदेशानंतर जिल्हा माहिती कार्यालय नव्या वास्तुत स्थालांतरीत होईल असा विश्वास व्यक्त केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!