’महाराजांच्या नावाने विमानतळ ओळखलं जाईल, याची व्यवस्था आम्ही केली’
मुंबई प्रतिनिधी
2 ऑगस्ट
मुंबई विमानतळावर अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावल्याने शिवसेना आक्रमक झाले आहेत. अदानी एअरपोर्ट असा बोर्ड दिसताचं शिवसैनिकांनी बोर्ड तोडला आहे. शिवसैनिकांनी याठिकाणी नारेबाजी देखील केली. शिवसैनिकांची गर्दी आता वाढू लागली आहे. सकाळपासून या हलचाली सुरू होत्या. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
’उद्योगपतींच्या नावाने विमानतळ ओळखलं जाणार असेल तर नक्कीचं ते शिवसेनेला मान्य नाही. महाराष्ट्राला मान्य नाही आणि देशालाही मान्य नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानेचं ओळखलं जायला हवं आणि ते जाईल, याची व्यवस्था देखील शिवसेना केल्या शिवाय राहणार नाही. असं राऊत म्हणाले आहे.
आज सकाळपासून शिवसैनिक आक्रमक झाले आहे आहेत. मुंबई एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे. तिथे महाराजांचं नाव असंल पाहिजे. याठिकाणी अदानी एअरपोर्ट असं नाव दिलं आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी ते तोडलं आहे. अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे.