ईडीचे पाचवे समन्स मिळताच अनिल देशमुखांनी लिहले पत्र, चौकशीला हजर राहण्याची शक्यता कमीच

मुंबई प्रतिनिधी

2 ऑॅगस्ट

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पाचव्यांदा समन्स बजावले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ॠषिकेश देशमुख यालाही समन्स बजावण्यात आले आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, संबंधित गुन्ह्यांची माहिती मिळावी असे पत्र अनिल देशमुख यांनी ए लिहिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख आजही चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता कमी आहे.

100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीने या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी करून 4 कोटींची संपत्तीही जप्त केली आहे. तसेच त्यांना आतापर्यंत 5 वेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, यावेळी देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवून एउखठ ची कॉपी देण्यात यावी, त्यांना जी कागद पत्र हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ॠषिकेश देशमुख एऊ कार्यालयात येण्याची शक्यता कमी आहे.

यापूर्वी 4 समन्स, ईडीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला नकार देत बजावले होते तिसरे समन्स –

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावून 5 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. ईडीकडून पाच समन्स बजावण्यात आले आहेत. पहिल्या दोन समन्सला ते ईडीसमोर हजर झाले नाही. देशमुखांनी ईडीला पत्र लिहून सांगितले होते, की त्यांचे वय 72 वर्षे असून ते अनेक व्याधींनी ग-स्त आहेत. कोरोनामुळे त्यांना तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या चौकशीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची विनंती केली होती. तर आता पाचव्या समन्सलाही देशमुखांनी पत्र लिहून माहिती मागवली आहे.

देशमुखांच्या खाजगी सचिव आणि सहायकाला ईडीने केले आहे अटक –

ईडीने काही दिवसांपूर्वीच देशमुख यांच्या नागपूर आणि मुबंई येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. त्यांच्या काही सहकार्‍यांची चौकशी ईडी करत आहे. देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!