प्रहारचे डॉ.विवेक सोनवणे मुक्ताईनगर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सामाजिक प्रश्नानविषयी चर्चा केली.
मुक्ताईनगर – दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्न संदर्भात आज प्रहार संघटनेचे डॉक्टर विवेक सोनवणे यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांची भेट घेऊन दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नाविषयी चर्चा केली.
तसेच दिव्यांग व्यक्तींचे विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे अशी मागणी प्रहार संघटनेचे डॉक्टर विवेक आणि यांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर पंचायत समिती येथे आढावा बैठक घेण्यात आली संबंधित बैठक आटोपल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ. विवेक सोनवणे यांनी मुक्ताई नगर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील दिव्यांग व्यक्तींच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले दिव्यांग व्यक्तींसाठी कुटुंबप्रमुखाचे अट न लावता ५०% घरपट्टी चि सवलत ,ग्रामपंचायत मालमत्ता करातून ५ टक्के अखर्चित निधी वाटप करणे ,ग्रामपंचायत स्तरावर १४ वित्त आयोगातून दिव्यांग व्यक्तींसाठी ५ टक्के निधी खर्च करणे ,विनाअट घरकुल योजनेची अंमलबजावणी करणे ,व अशा अनेक दिव्यांग कल्याणकारी योजनांची जिल्ह्यांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी या संदर्भात प्रहारचे डॉ विवेक सोनवणे यांनी विविध आंदोलने ,उपोषणे तसेच जिल्हा प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे.