इच्छापूर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष स्थानी साहेबराव घटे तर उपाध्यक्ष पदी दिनेश पाटील यांची निवड.
दैनिक महाराष्ट्र सारथी इच्छापूर प्रतिनिधी – चद्रकांत धाडे-
इच्छापूर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष स्थानी साहेबराव घटे तर उपाध्यक्ष पदी दिनेश पाटील यांची निवड करण्यात आली.
इच्छापुर -येथील जि. प. मराठी मुलांची शाळा येथे नुकतीच शालेय व्यवस्थापन समिती गठीत झाली असून समिती अध्यक्ष पदी साहेबराव देवराम घटे यांची निर्विवाद निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष पदी दिनेश पाटील यांची वर्णी लागली आहे, दि.30रोजी झालेल्या पालक सभेत ही निवळ करण्यात आली, तर सदस्य, पदी, सौ. कविता विनोद सोनवणे, सौ. शुभांगी निवृत्ती खीर्डेकर,दिनेश येरुकर, सौ रंजना निलेश भोई, बाळू सपकाळ, सौ शारदा सचिन भडांगे, सौ. अर्चना रविंद्र धाडे(ग्रा. प. सदस्य ) सचिव मुख्याध्यापक श्री. मोरे सर, श्री. चंद्रकांत धाडे (शिक्षणप्रेमी ) अशी करण्यात आली आहे. प्रसंगी मा. सरपंच शिवाजी पाटील, सरपंच गणेश पाटील, दिनेश वंजारी, ओंकार भोई, सुनिल घटे व पालक वर्ग उपस्थिती होती.