मुक्ताईनगर तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण

दैनिक महाराष्ट्र सारथी प्रतिनिधी

सविस्तर वृत्त असे :मुक्ताईनगर तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या गेल्या काही वर्षांपासून अनेक अडचणी असून त्या तात्काळ सोडविण्यात याव्यात त्यासाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे ग्राम रोजगार सेवक संघातर्फे गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ मुक्ताईनगर शाखेतर्फे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र रामराव देशमुख यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर यांना 15 सप्टेंबर रोजी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयातील केवळ एकाच तांत्रिक पॅनल अधिकाऱ्यावर कारवाई केलेली असून दुसरे तांत्रिक पॅनल अधिकारी असलेल्या भूषण चंदने यांच्यावर अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही इतके असूनही ते अद्यापही ग्रामरोजगार सेवकांची कोणतीच कामे करीत नाहीत त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ग्रामरोजगार सेवकांना प्रवास भत्ता अल्पोहार व प्रशासकीय खर्च 2013 पासून थकीत आहे परंतु आज पर्यंत सदरचा निधी ग्रामरोजगार सेवकांना प्राप्त झालेला नाही इतकेच नव्हे तर वाढीव मानधन त्याचप्रमाणे मार्च 2021 पासून चे थकीत मानधनापासून सुद्धा ग्राम रोजगार सेवक वंचित आहेत. त्यामुळे संसार चालवावा कसा असा प्रश्न तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकां समोर उभा ठाकला आहे. इतकेच नव्हे तर या कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून डाटा ऑपरेटर नसून ते पदही भरण्यात यावे. इतकेच नव्हे तर दोन टी पी ओ यांची मागणी करण्यात येत आहे ती पदे त्वरित भरण्यात यावीत सदरची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेतर्फे करण्यात येत आहे. परंतु आजपर्यंत यावर प्रशासनाने कुठलेही पाऊल उचललेले नाही यासंदर्भात त्वरित पावले न उचलल्यास आज रोजी पंचायत समिती कार्यालयाचे आवारात आमरण उपोषण करण्यात येत आहे. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी महाराष्ट्र शासन तसेच गट विकास अधिकारी प्रशासन हे जबाबदार राहतील अशा इशाराचे पत्र मुक्ताईनगर गटविकास अधिकारी यांना रोजगार सेवक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी दिले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!